आपल्याबद्दल

शांडिल्य प्रतिष्ठान पुणे - इतिहास आणि माहिती

स्थापना आणि वाटचाल

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान पुणे

महत्त्वाचे टप्पे
  • कुलवृत्तांत समिती स्थापना — १९७३
  • कुलवृत्तांत प्रकाशन — २८ मार्च १९८२
  • पहिले कुलसंमेलन — १९८२, पुणे
  • प्रतिष्ठान नोंदणी — १६ सप्टेंबर १९८३
  • नोंदणी क्रमांक — ई-८६५ (पुणे)
  • एकूण कुलसंमेलने — ४०+
  • कुलवृत्तांत पृष्ठे — १५०० पाने
वाटचाल मधील ठळक वैशिष्ट्ये👇
कुल वृत्तांत संपादन समिती( १९७२)

1 page • PDF • 383 KB

Download PDF
कुलवृत्तान्त विश्वस्त समिती(१९७२)

1 page • PDF • 469 KB

Download PDF
प्रतिष्ठानची आजवर झालेली संमेलने(१९८२-२०२६)

1 page • PDF • 618 KB

Download PDF

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानची स्थापना जरी १६ सप्टेंबर १९८३ रोजी झाली असली तरी त्याचा उगम त्यापूर्वी १० वर्षे कार्यरत असलेल्या 'चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशी कुलवृत्तांत समिती' यामध्ये आहे. श्री. परशुराम कमलाकर जोशी (सांप्रत वय ९७ वर्षे) यांचा बालपणापासून ध्यास होता की अशा प्रकारचा कुलवृत्तांत असायला पाहिजे.

परंतु सुरवातीलाच त्यांच्या लक्षात आले की माहिती संकलनाचे प्रचंड काम एकट्याला झेपण्यासारखे नाही म्हणून स्थानिक कुलबंधूंची एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष श्री. गो. न. तथा आबासाहेब जोशी, कार्याध्यक्ष श्री. गो. के. मनोळीकर, कोषाध्यक्ष श्री. ह. के.जोशी आणि कार्यवाह श्री. प. क. जोशी होते. पुढे या समितीत श्री. न. म. जोशी आणि श्री. बापूसाहेब जोशी यांचाही समावेश झाला.

विविध ठिकाणाहून वंशावळी आणि कुटुंबाची माहिती जशी जमा होऊ लागली तसे त्याचे संकलन करण्याचे अत्यंत बिकट काम श्री. रा. द. जोशी आणि श्री. दि. बा. मोकाशी यांनी केले. सारे हस्तलिखित संकलन झाल्यावर संपादकीय संस्करण दि. बा. यांनी केले. परंतु लेखन अपूर्ण स्थितीत असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. पुढे ती प्रस्तावना न. म. जोशी यांनी लिहिली.

हे माहिती संकलनाचे काम सुरु असतानाच प. क. जोशी आणि दिगंबरदास महाराज म्हणजेच विठ्ठलराव गणेश जोशी यांची भेट झाली. या भेटीनेच कुलवृत्तांत संपादनाचे काम सुकर झाले. प. क. पुढे वरचेवर दिगंबरदास महाराजांना भेटत राहिले.

अखेर ९ वर्षांचे अथक परिश्रमानंतर १५०० पानांचा महाकाय कुलवृत्तांत छापून तयार झाला. त्याचा प्रकाशन समारंभ मोठ्या थाटात २८ मार्च १९८२ रोजी पुण्यात ब्राह्मण मंगल कार्यालयात प्रसिद्ध पत्रकार, संगीत नाटककार पं. विद्याधर गोखले यांच्या शुभहस्ते साजरा झाला.

या समारंभाला जोडूनच, त्याच जागी पहिले कुलसंमेलन आयोजित केले. या संमेलनाचे अध्यक्षपदही पं. विद्याधर गोखले यांनी भूषविले. कुलवृत्तांत आणि संमेलन दोन्ही शांडिल्य गोत्री यांचे, पण अध्यक्ष पं. विद्याधर गोखले? या कोड्याचे उत्तर स्वतः विद्याधर गोखले यांनीच दिले. ते म्हणाले, "ज्या दोन व्यक्तींना मी माझे आदरणीय गुरु मानतो ते दोघे चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशीच आहेत. एक आहेत वऱ्हाडचे थोर सुपुत्र सर मोरोपंत जोशी आणि दुसरे वऱ्हाडातीलच थोर नाटककार वीर वामनराव जोशी." पुढील सर्व संमेलनांचे अध्यक्ष चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशीच आहेत. दुसरे संमेलन डिसेंबर १९८२ मध्ये आदरणीय मराठी भारतीय संस्कृती विश्वकोषाचे लेखक आदरणीय पं. महादेवशास्त्री जोशी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तिसरे संमेलन ऑगस्ट १९८३ मध्ये लोकसभा खासदार, 'कर्नाटक सिंह' जगन्नाथराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कुलवृत्तांतात ज्यांची नावे समाविष्ट आहेत त्यांची सूचीच (index) १५१ पानांची आहे. असंख्य देणगीदार यांची वेगळी सूची आहे. कुलबांधवांचे I.C.S., इतिहास प्रसिद्ध, क्रीडाजगत, साहित्यिक, सर्जन, डॉक्टर, नट, कलाकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, सेनादल अधिकारी, वैदिक विद्वान, वैद्यराज, असे विशिष्ट पृथ:करणही केले आहे

कुलवृत्तांत प्रकाशनानंतर समितीकडे रू. ४०,०००/- शिल्लक होते. आता ही समिती विसर्जित करून "महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान, पुणे" अशी न्यासाची (Trust) स्थापना करण्याचा निर्णय घेऊन १६ सप्टेंबर १९८३ रोजी ई-८६५ (पुणे) या क्रमांकाने धर्मादाय आयुक्त (पुणे) यांच्याकडे नोंदणी करण्यात आली.

विश्वस्त पत्रक (Trust Deed)तयार करण्याचे काम A. H. Joshi & Co. Chartered Accountants यांनी केले.

प्रतिष्ठानचे पहिले अध्यक्ष — श्री. आबासाहेब जोशी, उपाध्यक्ष — श्री. गो. के. मनोळीकर, कार्यवाह — श्री. प. क. जोशी, आणि विश्वस्त म्हणून श्री. मनोहर यशवंत उर्फ बापूसाहेब जोशी आणि श्री. न. म. जोशी ह्यांची नेमणूक झाली.

प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे सभासदत्वासाठी वर्गणी आकारली जात नाही. चित्तपावन शांडिल्य जोशी कुलातील प्रत्येक सज्ञान व्यक्ती सभासदत्वास आपोआप पात्र ठरते.

प्रतिष्ठान दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य, गरजू व्यक्तींना वैद्यकीय अर्थसहाय्य करत आहे. याव्यतिरिक्त भूकंप, पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक जबाबदारी पोटी पंतप्रधान/मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी देते.

प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतरही दिगंबरदास महाराज म्हणजेच विठ्ठलराव गणेश जोशी यांच्या अतींद्रिय सामर्थ्याची प्रचिती प. क. जोशी यांना आली. महाराजांनी क्षणार्धात कुलवृत्तांताच्या ३८ प्रती खरेदी करून वर प्रतिष्ठानला १ लक्ष रुपयांची देणगी त्या काळात दिली

गेल्या ४३ वर्षांत कोरोना साथीचा काळ वगळता प्रतिष्ठानने कार्यकर्त्यांच्या भरवशावरच ४० कुलसंमेलने अव्याहतपणे भरवली आहेत. त्यातील २१ पुण्यात तर १९ पुण्याबाहेर नागपूर, बडोदा, चिपळूण, रत्नागिरी, कोळथरे अशा ठिकाणी उत्तमरित्या भरवली गेली.त्या पुढे या नंतर सौ. मानसी जोशी प्रतिष्ठान च्या पहिल्या महिला सचिव यांनी वीस वर्षे सचिव पदाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे नानाविध संपर्कसाधने उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून कुलवृत्तांत अद्ययावत करण्याचा विचार आहे. ज्यांना जसं शक्य आहे त्यांनी तसे या कामाकरता योगदान द्यावे असे प्रतिष्ठानचे आवाहन आहे.

About the Trust (English)

Maharshi Shandilya Pratishthan, Pune

Quick facts
  • Registered Trust: E-865 (Pune) — 16-09-1983
  • Origin: Chittapavan Shandilya Gotri Joshi Kulvrittant Committee, 1973
  • Kulvrittant published: 28 March 1982 (approx. 1,600 pages)
  • Initial corpus after publication: Rs. 40,000
  • Kulsammelans organized: 40+

Maharshi Shandilya Pratishthan, Pune is a registered Public Charitable Trust (Registration No. E-865, Pune dated 16-09-1983). Its roots lie in the "Chittapavan Shandilya Gotri Joshi Kulvrittant Committee", established in 1973 to compile the family histories of Joshi families across India.

Shri Parashuram Kamalakar Joshi (now aged 97), who originally hailed from the village of Basani near Ratnagiri and later moved to Pune, was driven by a lifelong determination to publish the Chittapavan Shandilya Gotri Joshi Kulvrittant. He began the task in 1973 with very limited means. Recognizing the scope of the work, he formed a committee with Shri Abasaheb Joshi as President, Shri G.K. Manolikar as Working President, Shri H.K. Joshi as Treasurer and Shri P.K. Joshi as Secretary. Requests for family trees were sent far and wide and responses poured in.

The noted Marathi writer Shri D.B. Mokashi (Joshi) helped classify and compile the huge volume of material. Shri P.K. Joshi's collaboration with the spiritual figure Shri Vitthalrao Ganesh Joshi alias "Digambardas Maharaj" proved instrumental at several stages. After nine years of dedicated effort the voluminous (approx. 1,600-page) Kulvrittant was published on 28 March 1982 at a grand ceremony in Pune, with well-known dramatist and journalist Shri Vidyadhar Gokhale as the chief guest; the first Kulsammelan was organized alongside the publication.

Following publication and after meeting the printing expenses, the committee found a remaining balance of Rs. 40,000. The decision was taken to form a Public Charitable Trust with that balance to carry forward social objectives — providing financial assistance to deserving students for education, offering medical assistance to needy persons, and donating to relief funds during natural calamities such as floods, famines and earthquakes.

Shri P.K. Joshi managed office work and correspondence from a single room in his home for 25 years. As the Trust's activities grew, trustees purchased a small flat in central Pune in 1998 to serve as a dedicated office. Notably, Digambardas Maharaj purchased 38 copies of the Kulvrittant at once and donated Rs. 1,00,000 on the auspicious day of Ramnavami to support the Trust.

Except for the COVID period, the Trust has organized over 40 Kulsammelans — 21 in Pune and 19 in other cities such as Nagpur, Baroda, Chiplun and Ratnagiri. The Trust acknowledges the decades of dedicated service by Shri P.K. Joshi, ably supported by the first woman Secretary, Mrs. Manasee Joshi. The present Board of Trustees is undertaking the important task of updating the Kulvrittant using digital technology and the involvement of the younger generation; this will be an ongoing process and the Trust welcomes contributions from all who can assist.

वेदकालीन

महर्षी शांडिल्य ऋषी

'चित्त्पावन शांडिल्य गोत्र जोशी' यांचे मूळपुरुष / चित्पावन शांडिल्य गोत्राचे संस्थापक महर्षी शांडिल्य ऋषींचा उल्लेख ऋग्वेद, उपनिषद आणि पुराणांमध्ये आलेला आहे. शांडिल्य ऋषी हे देवल ऋषींचे पुत्र आणि महर्षी कश्यप ऋर्षीचे नातू होते. शांडिल्य ऋषींनी यज्ञविधित प्राविण्य मिळवून आणि भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले होते.

शांडिल्य ऋषींनी प्रभास क्षेत्रात उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. या प्रभास क्षेत्रातच त्यांनी शिवलिंग स्थापन केले. तेच सोरटी सोमनाथ आहे, असे म्हणतात.

महाभारत आणि इतर ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख राजा युधिष्ठिराच्या दरबारातील ऋषी म्हणून येतो. राजा दिलीप आणि त्रिशंकूचे पुरोहित म्हणूनही त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. भागवत पुराणानुसार हस्तिनापुराचा राजा परीक्षित आणि द्वारकेचा राजा ब्रज यांच्या काही आध्यात्मिक शंकांचे निरसन करण्यातही शांडिल्य ऋषींनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.

'शांडिल्य स्मृति', 'शांडिल्य धर्मसूत्र' आणि 'शांडिल्य उपनिषद्' इत्यादी ग्रंथ शांडिल्य ऋषींनी लिहिले. शांडिल्य ऋषींनी भक्तीशास्त्रावरही एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. 'शांडिल्य भक्तिसूत्रे' हे त्या ग्रंथाचे नाव आहे. 'जीवाने ब्रह्मरूप होणे, हेच भक्ताचे फळ', असे त्यांनी या ग्रंथात सांगितले आहे.

'शांडिल्य उपनिषद्' हा शांडिल्य ऋषींनी लिहिलेला एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ गद्य आणि पद्म अशा स्वरूपाचा असून यात एकूण तीन अध्याय आहेत. शांडिल्य ऋषींना अथर्व ऋषींकडून कल्याणकारी ब्रह्मविद्या प्राप्त झाली. त्याची प्राप्ती करून देणारा अष्टांगयोग, तसेच हठयोगातील काही प्रक्रिया ह्या सर्वांचे विस्तृत वर्णन 'शांडिल्योपनिषद्' ग्रंथात करण्यात आले आहे. शांडिल्य उपनिषदात आढळणाऱ्या योगाचे वर्णन वेदांतदर्शनावर आधारित आहे. योगदर्शन आणि वेदांतदर्शन याचा मेळ या शांडिल्य उपनिषदात आहे. महर्षी पतंजलींनी योगसूत्रात कोणत्याही आसनाचा उल्लेख केलेला नाही; तर शाण्डिल्य उपनिषदात आसनांच्या नावांचा उल्लेख केला आहे. शांडिल्य उपनिषदात ध्यानाचे सगुण आणि निर्गुण असे दोन प्रकार सांगितले आहेत.

हे सारे, मूळचे चित्तपावन (शांडिल्य) जोशीच, बरं का...!

या आडनावांचे मूळ चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशी :

उत्तुरकर, आमडेकर, धनवटकर, घुले, घोरपडे, जोशीराव, टकले, टोकेवर, दणगे, दाणेकर, दुगल, नामजोशी, पाटणकर, फडणीस, बावडेकर, भाटे, मटंगे, मनोळीकर, मेडदकर, मोकाशी, योगी, राजवाडे, वाडेकर, शेंडे, हरिश्चंद्रकर, हुपरीकर,चासकर, सुरनीस ही आडनावे धारण करणारे सर्वजण मूळचे चित्तपावन शांडिल्य गोत्री जोशीच आहेत.

विविध कारणांनी काही पिढ्यांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी ही आडनावे स्वीकारली. १९८२ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तान्तात या आडनावांचा समावेश झालेला आहे.गेली ४० वर्षे आपण आपले कुलसंमेलन साजरे करीत आहोत. तथापि कित्येकांना ते अजूनही माहीत नसल्याचे आढळून आले आहे. म्हणून त्यांनी आता होणार असलेल्या संमेलनात अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करीत आहोत.